नरेंद्र मोदींची जादू कमी झाली आहे ? कशी ? वाचा ही बातमी !

नरेंद्र मोदींची जादू कमी झाली आहे ? कशी ? वाचा ही बातमी !

पाटणा – बिहारमध्ये नुकतीच एनडीएमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच हा फॉर्मुला जाहीर केला आहे. ठरलेल्या सुत्रानुसार बिहारमधील एकूण ४० जागांपैकी भाजप १७ जागा तर जेडीयू १७ जागा लढवणार आहे. तर इतर ६ जागा त्यांचे मित्र पक्ष लोजपा आणि उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष लढणार आहे.

मात्र या नव्या जागावाटपाच्या फार्म्युल्यावरुन आता उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. २०१४ मध्ये भाजप, रामविलास पासवान यांचा पक्ष आणि उपेद्र कुशवाह यांचा पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. नितीश कुमार यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी  भाजपनं २२ जागा जिंकल्या होत्या. भाजपनं गेल्यावेळी २२ जागा जिंकल्या असताना यावेळी भाजप १७ जागांवर लढणार आहे. मग जिंकलेल्या जागा सुद्धा भाजप का लढवणार नाही  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जेडीयूनं गेल्यावेळी केवळ २ जागा जिंकल्या होत्या. असं असताना त्यांना तब्बल १७ जागा का दिल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोदींची लाट संपली आहे. त्यामुळे आता भाजपला स्वबळावर जागा जिंकण्याचा विश्वास नसल्यामुळच पक्षाच्या तब्बल ५ जागांवर पाणी फेरून जेडीयूसोबत हातमिळवणी केली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. काही ओपिनियन पोलमध्ये मोदींची जादु कमी झाल्याचं पुढं आलं आहे. मात्र  बिहारमधील जागावाटपावरुन भाजपनंही ते मान्य केलं आहे अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS