नाशिक – मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !

नाशिक – मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !

नाशिक – नाशिक महापालिकेत भाजपमध्ये सुरु असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला  आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेते दिनकर पाटील आणि स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. प्रभागातील विकास कामावरुन दिनकर पाटील बोलत असताना त्यांना मध्येच थांबवल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला. या सगळ्या प्रकरणानंतर दिनकर पाटील भडकले आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके यांच्यावर सदस्यांना सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान नाशिक महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून कुठल्या न कुठल्या कारणावरुन भाजपमध्ये संघर्ष सुरु आहे. ३ दिवसांपूर्वीच नाशिकमधील सर्व भाजप नेत्यांची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतली होती. या बैठकीत भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला होता. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही भाजप नेत्यांमध्ये हा वाद सुरु असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS