नाशिकमध्ये इंजिन सुसाट, मोदीमुक्त भारताची नाशिकमधून सुरुवात, मनसेची प्रतिक्रिया !

नाशिकमध्ये इंजिन सुसाट, मोदीमुक्त भारताची नाशिकमधून सुरुवात, मनसेची प्रतिक्रिया !

नाशिक – महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले यांचा विजय झाला आहे. प्रभाग 13 क मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत १८२० मतांनी वैशाली यांचा विजय झाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा दिला होता. या पोटनिवडणुकीत मनसेला 7 हजार 453 मतं मिळाली असून भाजपला 4 हजार 810 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेला 5 हजार 131 मतं मिळाली आहेत. मनसेच्या या विजयामुळे राजसाहेब यांनी मोदी मुक्त भारताची घोषणा केली त्याची नांदी या पोटनिवडणुकीत बघायला मिळाली असल्याचं मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी म्हटलं आहे. मनसेच्या दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे मनसेला त्यांची जागा कायम राखण्यात यश आलं आहे.

दरम्यान या महापालिकेत मनसेचे ५ नगरसेवक असून महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे आहे.

शिवसेना – ३५

भाजप – ६६

राष्ट्रवादी – ६

काँग्रेस – ६

मनसे – ५

अपक्ष – ३

आरपीआय – १

COMMENTS