नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार, आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार, आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

मुंबई – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं सुरू असून त्या लवकरच भाजपातील जातील असं बोललं जात आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. याठिकाणी गावित यांचा मोठा जनसंपर्क असून इगतपुरीमधून त्या सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.तसेच आमदार गावित यांच्या कन्या नयना गावित या नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसला इगतपुरी विधानसभा मतदारसंघातही धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS