देशभक्तीपर कार्यक्रमात अश्लील नाच, भाजपच्या नेत्याची हजेरी !

देशभक्तीपर कार्यक्रमात अश्लील नाच, भाजपच्या नेत्याची हजेरी !

नाशिक – शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं होतं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना या कार्यक्रमात तरुणींनी अश्लील नृत्य केल्याचं पहावयास मिळालं आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द भाजपचे आमदार अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भाजप कार्यकर्त्यांवर आणि आमदारावर जोरदार टीकास्त्र केलं जात आहे.

दरम्यान भाजप पदाधिका-यांच्या या कृत्यामुळे नाशिकचं बिहार करायचं आहे का असा संतप्त सवाल विरोधकांककडून केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा मनसेच्या नगरसेवकांनी निषेध केला असून भाजप पदाधिकारी आणि आमदार अपूर्व हिरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

COMMENTS