नाशिकमध्ये शिवसेना आघाडीवर भाजप तिस-या क्रमांकावर तर कोकणात भाजप आघाडीवर राष्ट्रवादी तिस-या क्रमांकावर !

नाशिकमध्ये शिवसेना आघाडीवर भाजप तिस-या क्रमांकावर तर कोकणात भाजप आघाडीवर राष्ट्रवादी तिस-या क्रमांकावर !

मुंबई – विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदविधर या दोन मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला असून कोकण आणि नाशिक शिक्षक पदविधर निवडणुकीचा निकाल अजून बाकी आहे. या निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून  नाशिकमध्ये दुस-या फेरीनंतरची आकडेवारी हाती आली आहे. दुस-या फेरीतही शिवसेनेचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. दराडे यांना दुस-या फेरीत 13957 मते मिळाली असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे 8232 मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच भाजपचे अनिकेत पाटील हे 4792 मतांनी तिस-या स्थानावर आहेत. तर उपक्ष असलेले भाऊसाहेब कचरे हे 4753 मतांनी चौथ्या स्थानावर आहेत.

दरम्यान कोकण पदविधर निवडणुकीचा कल हाती आला असून पहिल्या फेरीत भाजपचे निरंजन डावखरे हे आघाडीवर आहेत. भाजपचे निरंजन डावखरेंना पहिल्या फेरीत 10304 मते मिळाली असून  दुस-या स्थानावर असलेल्या शिवसेनेच्या संजय मोरे यांना 9494 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर असून त्यांना पहिल्या फेरीत 6500 मतं मिळाली आहे. दुस-या फेरीतील मतमोजणी सुरु असून याकडे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS