नाशिक – मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय!

नाशिक – मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय!

नाशिक – मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र.6 क साठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार फैमिदा फारूक कुरेशी 506 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी जनता दलाच्या शकिला खान यांचा पराभव केला कुरेशी यांना 5348 तर खान 4842 मते पडली. विशेष म्हणजे गतवेळी पराभूत 4 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या फैमिदा यांनी विजयश्री खेचून आणत जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या गडात जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान जनता दलाच्या नगरसेविका साजेदा मोहम्मद याकूब यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या विजयानंतर महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या 26 झाली आहे.काँग्रेस विजयी होताच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही पक्षांनी जोर लावला होता.

COMMENTS