भाजपच्या सतीश कुलकर्णींची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड !

भाजपच्या सतीश कुलकर्णींची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड !

नाशिक – भाजपच्या सतीश कुलकर्णी यांची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. संख्याबळ जुळत नसल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे कुलकर्णी यांच्या विरोधात भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनही काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे नाशिकमध्ये महासेनाआघाडीत पहिल्याच निवडणुकीत ‘महा’फूट पडली असल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. भाजपला 65, शिवसेना 35,
काँग्रेस 07, राष्ट्रवादी 07, मनसे 05
असं संख्याबळ आहे. मात्र भाजपला स्पष्ट बहुमत असलं तरी महापौरपदाच्या निवडणुकीत काही नगरसेवकांची फोडाफोडी होऊ शकते, या भीतीने पक्षाने आपले नगरसेवक अज्ञातस्थळी नेले होते. सात नगरसेवकांनी या सहलीला जाण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. हे नगरसेवक भाजपमधून राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपला धास्ती वाटत होती. परंतु संख्याबळ जुळत नसल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या सतीश कुलकर्णी यांची नाशिकच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

COMMENTS