नाशिक – स्थानिक भाजप नेते तोंडघशी, मुख्यमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर तुकाराम मुंढेंच्या विरोधातील अविश्वास ठराव मागे घेणार !

नाशिक – स्थानिक भाजप नेते तोंडघशी, मुख्यमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर तुकाराम मुंढेंच्या विरोधातील अविश्वास ठराव मागे घेणार !

नाशिक – महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन स्थानिक भाजप नेते तोंडघशी पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दट्ट्यानंतर मुढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव उद्या मागे घेण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटविण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे हे नेते आता तोंडघशी पडले आहेत.

दरम्यान धडक कामगिरीमुळे नवी मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही सर्वपक्षीयांच्या रोषाला तोंड द्यावे लागलेल्या मुंढेंच्या विरोधात भाजपाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत तो पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यक खर्चाला पायबंद घालत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला. यामुळे भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांना हादरा बसला होता. त्यामुळे मुंढे यांना हटवण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी सर्वोतोपरी तयारी केली होती. परंतु त्यांची ही तयारी अखेर फसली असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS