भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, मोदींना दाखवणार काळे झेंडे !

भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, मोदींना दाखवणार काळे झेंडे !

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. परंतु या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रमापासून डावलले जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार नाहीत. तसेच स्थानिक शिवसैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरुन पुन्हा एकदा सेना-भाजपमधली धूसफूस समोर आली आहे. रविवारी होणा-या या कार्यक्रमाला सत्तेतील सहभागी पक्ष म्हणून शिवसेनेने उपस्थिती लावणे गरजेचं आहे परंतु आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्यामुळे कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवून शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील धरी आणखी वाढत जात असल्याचं दिसत आहे.

COMMENTS