आमदार गणेश नाईकांच्या साम्राज्याला मोठं खिंडार, 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत ?

आमदार गणेश नाईकांच्या साम्राज्याला मोठं खिंडार, 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत ?

नवी मुंबई – आमदार गणेश नाईकांच्या साम्राज्याला मोठं खिंडार पडलं असून भाजपमधून आणखी 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले आहेत. नवी मुंबईतील 5 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसेच नवी मुंबईतील एकूण 10 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला असल्याची माहिती आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांनी काल बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रभागातील बदललेल्या परिस्थितीमुळे भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा धसका घेतल्याची चर्चा आहे. पाच जण शिवसेनेत तर सहा जण राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS