शिवसेना नगरसेवकाने फार्म हाऊसवर नेऊन विनयभंग केला, तरुणीची पोलिसात तक्रार !

शिवसेना नगरसेवकाने फार्म हाऊसवर नेऊन विनयभंग केला, तरुणीची पोलिसात तक्रार !

नवी मुंबई – शिवसेना नगरसेवकाने फार्म हाऊसवर नेऊन विनयभंग केला असल्याची तक्रार एका 19 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे केली आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 354 अन्वये भगत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना अद्याप अटक केली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान काही कामानिमित्त आपण नामदेव भगत यांना भेटण्यासाठी त्यांच्या उरण तालुक्यातील दिघोडे येथील फार्म हाऊसवर गेले होते. त्यावेळी भगत यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांच्या अडचणीत वाढ झाली असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

COMMENTS