ब्रेकिंग न्यूज – नवी मुंबई – महापौरपदी अखेर राष्ट्रवादीचे जयवंत सुतार !

ब्रेकिंग न्यूज – नवी मुंबई – महापौरपदी अखेर राष्ट्रवादीचे जयवंत सुतार !

नवी मुंबई – यावेळची महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी करणारे विजय चौगुले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. जयवंत सुतार यांनी आरामात निवडणूक जिंकली. त्यांना राष्ट्रवादीची 52, अपक्षांची 5 आणि काँग्रेसची 10 अशी एकूण 67 मते मिळाली.  सुतार यांनी शिवसेनेचे सोमनाथ वासकर यांचा पराभव केला. सोमनाथ वासकर यांना 38 मते मिळाली. भाजपने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. उपमहापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार निवडणू आला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या 111 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने बहुमत मिळवले होते. मात्र काठावरचे बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मतदाने सत्ता स्थापन केली. काँग्रेसला पहिले अडीच वर्ष उपमहापौरपदही दिले. काँग्रेसचे 10 नगरसेवक आहेत. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी झाली होती.

 

नवी मुंबई महापालिका – पक्षीय बलाबल

एकूण जागा – 111

राष्ट्रवादी +  अपक्ष – 57

शिवसेना    – 38

काँग्रेस   – 10

भाजप   – 6

COMMENTS