ते ‘राम’ नाही तर ‘रावण’ कदम आहेत – नवाब मलिक VIDEO

ते ‘राम’ नाही तर ‘रावण’ कदम आहेत – नवाब मलिक VIDEO

मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांचा ‘रावणी’ चेहरा समोर आला आहे. हा राम नाही तर रावण कदम आहे. त्यांचे वक्तव्य हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राम कदम यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा आजपासून आम्ही त्यांना रावण कदम असं म्हणणार असल्याचंही यावेळी मलिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS