पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना न्यायालयाकडून दिलासा !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना न्यायालयाकडून दिलासा !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अॅव्हनफिल्ड अपार्टमेंट भ्रष्टाचारप्रकरणी नवाझ यांना दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. परंतु इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली आहे. तसेच शरीफ यांची मुलगी मरीयमलाही उच्च न्यायालयानं दिलासा दिला असून मरीयमला सात वर्षांच्या व सफदरला दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. याबाबत कोणताही पुरावा नसल्यामुळे त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या जामिनावर सुटका देण्यात आली आहे.

दरम्यान शरीफ व सफदर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कयामध्ये त्यांनी प्रतिवाद केला होता. न्यायाधीश अथर मिनाल्लाह यांनी शरीफ व सफदर यांची मुक्तता केली असून नॅशनल अकांउंटिबिलिटी ब्युरोनं शरीफ यांची इंग्लंडमधल्या या आलिशान अपार्टमेंटमधल्या चार फ्लॅट्सची मालकी सिद्ध होईल असा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. केवळ, गृहीतकावर अशी मालकी आम्ही मान्य करावी अशी सरकारी वकिलांची अपेक्षा आहे, जे शक्य नसल्याचं न्यायाधीशांनी स्पष्ट करत त्यांची मुक्तता केली आहे.

 

COMMENTS