शाब्दिक वाद पेटला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामना पेपरच्या प्रती जाळल्या !

शाब्दिक वाद पेटला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामना पेपरच्या प्रती जाळल्या !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्यावर सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कार्यकर्त्यांनी सामना वृत्तपत्राच्या प्रति जाळून निषेध केला आहे. पुण्यातील अभिनव चौकात सामना ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली सामना पेपरच्या काही प्रती जाळण्यात आल्या.

सामना ऑफिस समोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शिवसैनिक देखील ऑफिससमोर आले होते. तसेच युवा एल्गार मेळावा संपल्यानंतर कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रतीचे दहन केले आहे.

शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी देखील शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं असून मी खर बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना कोल्हापूरी मिर्च्या का झोंबल्या असा त्यांनी विचारला आहे. तसेच शहरी भागातील लोकांना कळण्यासाठी वडील काढला आणि ग्रामीण भागातील लोकांना कळण्याकरतीला बाप काढला. यात काय चुकलं असा सवाल देखील त्यानी विचारलाय. सामना पेपर कोणी जास्त वाचत नाही. कारण तो पेपर शिवसेनेचं मुखपत्र आहे.

पण एखाद्या वृत्तपत्रातील अग्रलेखात अशी भाषा वापरणे शोभत नसल्याचे देखील अजितदादा पवार यानी म्हटलय. अजित पवार हे शरद पवार यांच्यामुळे आहेत या सामनातील टिकेवर उत्तर देताना; अजितदादा पवार यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच अस्तित्वात असल्याचे विधान केलं. शिवसेनेची अशा पध्दतीची टीका म्हणजे विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणावी लागेल, त्याचबरोबर कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत अस देखील अजित पवारांनी म्हटल आहे.

 

COMMENTS