भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार !

भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. गांधीनगर मतदारसंघातून लढत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवत आहेत. अमित शाह यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप तिकीट वाटप अंतिम झालेले नाही. मात्र, शंकरसिंह वाघेला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी झालेली असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे तिकीट कापून अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शाह यांच्याविरोधात वाघेला यांना उमेदवारी देण्याचं राष्ट्रवादीनं ठरवलं आहे. शंकरसिंह वाघेला यांनी 1989 मध्ये याच मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हा मतदारसंघ लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी सोडण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अडवानींना हटविल्याने आघाडीने वाघेलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शाह विरुद्ध वाघेला असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS