नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. नगरमधून संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे-पाटील यांना टक्कर देण्यासाठी संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताव विरुद्ध सुजय विखे असा सामना पहायला मिळणार आहे.

दरम्यान संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे कर्डिले संग्राम जगताप यांना मदत करतील असा राष्ट्रवादीचा अंदाज
आहे.

COMMENTS