अजित पवारांना मोठा दिलासा, सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीनचिट !

अजित पवारांना मोठा दिलासा, सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीनचिट !

नागपूर – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलं आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नसल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सिंचन घोटाळ्याची उघड चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. सिंचन घोटाळ्यातील ज्या 9 प्रकरणांची चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांचा अजित पवार यांच्याशी काहीही संबंध नाही, अशी माहिती महाराष्ट्र लाचलुचपत विभागाचे डीजी परमबीर सिंग यांनी दिली होती. त्यानंतर आता विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलं आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नसल्याचं या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS