राष्ट्रवादीतून रोहीत पवार यांच्या उमेदवारीला विरोध!

राष्ट्रवादीतून रोहीत पवार यांच्या उमेदवारीला विरोध!

अहमदनगर – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहीत पवार उत्सुक आहेत. परंतु रोहीत पवार यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध करण्यात आला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी वाढली असल्याचं दिसत आहे.

या मतदारसंघातून मंजुषा गुंड या नक्की निवडून येतील, असं परहर म्हणाले.काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. पंचायत समितीतही त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत, त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे आणि त्यामुळेच गुंड यांनाच उमेदवारी मिळावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहीत पवार उमेदवारीसाठी आग्रही आहे. गेली दोन वर्षांपासून ते या मतदारसंघात विविध कामं करत आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. परंतु आता त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत आता शरद पवार हे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS