लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विधानसभेसाठी तयारी, अंतर्गत स्पर्धा वाढली!

लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विधानसभेसाठी तयारी, अंतर्गत स्पर्धा वाढली!

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यानं आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदेयांचा भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पराभव केला. त्यानंतर आता संजयमामा शिंदे हे विधानसभेसाठी करमाळा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतचे संकेतही दिले होते. पण करमाळ्यात राष्ट्रवादीकडून रश्मी बागल यादेखील उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच जर संजयमांमानी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला तर करमाळ्यातील तिकीटावरून राष्ट्रवादीतच स्पर्धा निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून एकाच तालुक्यात दोन नेते इच्छुक असल्याने पक्षाची अडचण झाली आहे. त्यामुळे ज्याला तिकीट नाकारलं जाईल, तो शिवसेना किंवा भाजपमध्ये तर जाणार नाही ना, याचाही विचार राष्ट्रवादीला करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात संजयमामा शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS