‘या’ मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच मिळेना, मुलाखतीला एकही नेता आला नाही!

‘या’ मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच मिळेना, मुलाखतीला एकही नेता आला नाही!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरु केली आहे. काही पक्षांकडून उमेदवारी देण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंही राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मुलाखतींचा धडाका सुरु केला आहे. पक्षाकडून मराठवाड्यातील नेत्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. लातूर मतदारसंघासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. परंतु या मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला नसल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचा एकही नेता मुलाखत देण्यासाठी आला नाही.

दरम्यान जिल्ह्यातील सहा मतदारसंघासाठी आज काँग्रेसचे नेते राणा जगजितसिंह यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी लातूर मतदारसंघ वगळता इतर पाच मतदारसंघासाठी एकूण 16 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. परंतु लातूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्यामुळे या मतदारसंघाकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS