बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर, शरद पवारांनी घेतली ‘या’ नेत्याची भेट!

बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर, शरद पवारांनी घेतली ‘या’ नेत्याची भेट!

बारामती – आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिसत आहे. कारण हर्षवर्धन पाटील पाटील यांची नाराजी दूर करण्यात राष्टेरवादीच्या नेत्यांना यश आलं असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील जाहीर केला आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, त्यामुळे दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला होता.

आज स्वतः शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर होईल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

COMMENTS