राष्ट्रवादीच्या बैठकीत उस्मानाबाद, बीड, आणि परभणीमध्ये  “या” नावांवर झाली चर्चा !

राष्ट्रवादीच्या बैठकीत उस्मानाबाद, बीड, आणि परभणीमध्ये  “या” नावांवर झाली चर्चा !

मुंबई – लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत तीन लोकसभा मतदारसघांचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार रायगड, कोल्हापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरल्याचं कळतंय. या तीन मतदारसंघासोबत आणखी तीन लोकसभा मतदारसंघाबात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. उस्मानाबाद, बीड आणि परभणीमधील उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचं कळतंय.

उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या नावावर चर्चा झाल्याचं कळतंय. मात्र डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उमेदवारीच्याआड प्रकृती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील आणि दिलीप सोपल यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राणा जगजितिसिंह पाटील यांना मतदारसंगात पक्षांतर्गत विरोध नाही. मात्र काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण आणि बसवराज पाटील मनापासून मदत करतील का याबाबत साशंकता आहे. तरीही जिल्ह्यात पाटील कुटुंबियाची असलेली ताकद यावर त्यांना तिकीट मिळू शकते. दुसरीकडे दिलीप सोपल यांच्याही नावावर चर्चा झाली. मतदारसंघात त्यांनाही फारसा विरोध नाही. तसंच मतदारसंघात असलेली लिंगायत मतांचं गणित पाहता त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे या तीन नावांवर चर्चा झाल्याचं समतंय. जयदत्त क्षीरसागर पक्षावर नाराज असल्याचं कळतंय. त्यातचं ते भाजपशी जवळीक साधताना दिसत आहे. मात्र सध्याचं बदलतं वारं पाहता तेही राष्ट्रवादीमध्ये राहतात का ते पहावं लागेल. मात्र धऩंजय मुंडे, अमरसिंह पंडित आणि घरातच म्हणज्येच पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याशी जयदत्त यांच्याशी फारसे पटत नाही. त्यामुळे नेमकं काय होतं ते पहावं लागेल. अमरसिंह पंडित यांनी तर लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तिकीट क्षीरसागर की पंडित यांना याबाबत उत्सुकता आहे. क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित यांच्या उमेदवारीवरुन वाद झालाच तर जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांचं नाव पुढं येऊ शकतं.

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असूनही पक्षाकडे तितकासा तगडा उमेदवार नसल्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा होती. मात्र आता परभणी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. या मतदारसंघातून पक्षाचे जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्या नावावर चर्चा झाली. तसंच विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नावावरही चर्चा झाल्या कळतंय. दोनच दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी वर्तमान पत्रात दिलेली जाहीरात हा मतदारसंघात चर्चेचा विषय झाला होता. परिस्थिती बदलेले, खासदार बदला अशी ती  जाहीरात होती. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

COMMENTS