बिहार विधानसभा निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, शरद पवारांसह या नेत्यांची नावं जाहीर!

बिहार विधानसभा निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, शरद पवारांसह या नेत्यांची नावं जाहीर!

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह एकूण ३९ स्टार प्रचारकांची फौजच तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी

शरद पवार

प्रफुल्ल पटेल

सुनील तटकरे

के. के. शर्मा

सुप्रिया सुळे

नबाव मलिक

नरेंद्र वर्मा

राजीव कुमार झा

गोविंदभाई परमार

चौधरी वेद पाल

उमा शंकर यादव

एस.पी. शर्मा

मुरली मनोहर पांडे

राहत कादरी

जितेंद्र पासवान

ललिता सिंग

संजय केशरी

इश्तिक आलम

अकबर अली

मनोज जैस्वाल

खुश्रो आफ्रिदी

ब्रिज बिहारी मिश्रा

शकील अहमद

अझहर आलम

इंदु सिंग

चांद बाबू रहमान

चंद्रेश कुमार

चंद्रशेखर सिंग

विरेंद्र सिंग

राजेंद्र जैन

सच्छिदानंद सिंग

ब्रिजमोहन श्रीवास्तव

के.जे.जोसेमन

डॉ. फौजिया खान

धीरज शर्मा

सोनिया दुहान

शब्बीर अहमद विद्रोही

पुष्पेंद्र मलिक

सीमा मलिकविरेंद्र सिंग

एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिला टप्पा मतदानाची तारीख 28 ऑक्टोबर असणार आहे तर, दुसरा टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर होणार आहे. तर बिहार निवडणुकीचा निकाल हा 10 नोव्हेंबरला जाहीर लागणार आहे.

COMMENTS