राष्ट्रवादीचा मुंबईत बैलगाडी मोर्चा !

राष्ट्रवादीचा मुंबईत बैलगाडी मोर्चा !

मुंबई – वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. नोट बंदी, जीएसटी यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे भाजप सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादीनं आज मुंबईत बैलगाडी मोर्चा काढला होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य सहभागी झाले होते. नवाब मलिक यांनी स्वतः बैलगाडी चालवून सरकारचा निषेध केला आहे.

दरम्यान जगातील ८० डॉलर पर बॅरल या भावाने आपण हिशोब केला तर ३५ रुपये प्रतिलिटर पेट्रोलला आंतरराष्ट्रीय भाव मिळतो. मग इतर पैसे कुठे जातात. ३३ रुपये असेच येतात मग ५२ रुपये केंद्र आणि राज्यसरकारच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. तसेच एक्साईज डयुटीच्या माध्यमातून केंद्र सरकार १८ रुपये हडप करत असून एक्साईज ड्युटीद्वारे ४० रुपये या राज्य सरकारच्या तिजोरीत जातात. यामध्ये वेगवेगळे कर लावले जात असून दुष्काळी कराच्या नावाने दुष्काळ दुर होत नाहीय. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत.तसेच २०१७ सालापासून सेस सुरु असल्याचंही यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS