निकालाआधीच बॅनरबाजी, कार्यकर्त्यांकडूून निवडणूक जिंकल्याबाबत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं अभिनंदन!

निकालाआधीच बॅनरबाजी, कार्यकर्त्यांकडूून निवडणूक जिंकल्याबाबत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं अभिनंदन!

पु‌णे – विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल 24 तारखेला लागणार आहे. परंतु निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय कार्यकर्त्यांनी घेषित केला आहे. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज काही ठिकाणी लागले आहेत. त्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे..

दरम्यान सचिन दोडके विद्यमान नगरसेवक असून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी सुद्धा दोडकेंनी असेच फलक लावले होते. विशेष म्हणजे पुण्यात भाजपची लाट असताना देखील दोडकेंच्या प्रभागात चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही दोडकेंच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच विजयाचे बॅनर लावले आहेत. याठिकाणी दोडके यांच्या विरोधात भाजपचे भीमराव तापकीर हे उमेदवार आहेत. तापकीर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून याठिकाणी कोण बाजी मारणार हे 24 तारखेलाच समजणार आहे.

COMMENTS