निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडले महागात!

निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडले महागात!

रत्नागिरी – विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल लागण्यापूर्वीच विजयी मिरवणूक काढणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला महागात पडले आहे. खेड दापोलीचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कदम यांच्यासह त्यांची पत्नी सायली कदम यांच्यावरही खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कदम यांचे समर्थक खेड येथे जमा झाले. त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ही मिरवणूक ताबडतोब रद्द करायला लावली. परंतु तरीही त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी पुन्हा मिरवणूक सुरु केली. त्यामुळे संजय कदम यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS