छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ ?

छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ ?

मुंबई – माजी  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. कारण छगन भुजबळ यांनी पुण्यातील जाहीर सभेत केलेल्या तडफदार भाषणामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भाषणादरम्यान भुजबळ यांनी इडीच्या छाप्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हे वक्तव्य त्यांना भोवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. छगन भूजबळांच्या भाषणावर आक्षेप नोंदवण्यात आला असून छापा कधी पडणार यासंदर्भात आपल्याला आधीच माहिती मिळत होती असा दावा त्यांनी केला होता . त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर इडीकडून कारवाई केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.

भुजबळांचं भाषणातील वक्तव्य

कुटुंबातील लहान लहान मुली घाबरायच्या, शेवटी शेवटी ती धाड येणार असं सांगणारा कुणी ना कुणी असतोच आपला तिकडे बसलेला जो हळूच काहीतरी सांगतो,बाबा आज काहीतरी गडबड आहे. मग सगळ्या आमच्या महिलांनी ,मुलांनी त्या लहान मुलींना घेवून कुणाच्या तरी घरी जाऊन बसायचं,मुली घाबरू नयेत म्हणून,किंवा कोणत्या तरी मॉल मध्ये जाऊन … तर अशा ज्या धाडी ज्या आहेत त्यातून मिळालं काहीच नाही. असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी भाषणादरम्यान केलं होतं.

दरम्यान पुण्यातील एका नागरिकाने त्यांच्या या वक्तव्याबाबत पुणे पोलिसांच्या विशेष शाखेसह सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदारांच्यावतीने त्यांचे वकील अॅड. अतुल पाटील यांनी दि. १४ जून २०१८ रोजी यासंदर्भात तक्रार दिली असून भुजबळ यांना धाडी पडण्याआधी आज काहीतरी गडबड होणार आहे हे सांगाणारे लोक नेमकं कोण आहेत हे सर्वांसमोर आलं पाहिजे असं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS