शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई : करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात लस घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपापलं योगदान देण्याचं आवाहनही केलं. ‘मी एम्स रुग्णालयात कोविड १९ लसीचा पहिलाच डोस घेतला. कोविड १९ विरुद्ध जागतिक लढाईला मजबूत करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी केलेलं गतीशील कार्य उल्लेखनीय आहे’ असं ट्विट पंतप्रधानांनी केले.

मोदींप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली. आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो,” असं पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

COMMENTS