राष्ट्रवादीतील वाद चिघळला, हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंचा जयदत्त क्षीरसागरांवर हल्लाबोल !

राष्ट्रवादीतील वाद चिघळला, हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंचा जयदत्त क्षीरसागरांवर हल्लाबोल !

बीड – बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आणखी चिघळला आहे. शेतक-यांच्या विविध प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर हल्लाबोल करण्यात आला.

हल्लाबोल यात्रा काल बीड जिल्ह्यात होती. या यात्रेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर गैरहजर होते. विषेश म्हणज्ये हल्लाबोल यात्रा तुळजापूरहून सुरू झाली. पहिल्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यात्रेला हजर होते. मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात ते गैरहजर राहिले. यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. हल्लाबोल हा कोणा एका व्यक्तीचा प्रश्न नाही मात्र राष्ट्रवादीतील काही जण सध्या कन्फ्युज आहेत. आष्टीवाल्याचं जे झालं ते आपलं होईल का अशी शंका त्यांना येत असल्याने त्यांनी हल्लाबोल कडे दुर्लक्ष केले, राष्ट्रवादी कोणाची एकट्याची नाही, हल्लाबोल हा शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे सगळ्या बीड जिल्ह्याने यात सहभागी व्हावे असे म्हणत मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना टोले लागवले.

बीड विधानसभा मतदार संघात पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे सूत्रं दिल्याने जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत. त्यामुळे ते काल हल्लाबोल यात्रेला गैरजह राहिल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर आता थेट हल्लाबोल केल्याने क्षीरसागर आता त्याला काय उत्तर देतात आणि पुढची त्यांची वाटचाल कशी असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

COMMENTS