लोकसभेतील पराभवामुळे राष्ट्रवादीच्या परळीतील नगरसेवकाचा राजीनामा !

लोकसभेतील पराभवामुळे राष्ट्रवादीच्या परळीतील नगरसेवकाचा राजीनामा !

बीड – लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशात कमळ फुललं आहे. राज्यातही शिवसेना-भाजप युतीला 48 पैकी 41 जागा मिळाल्या आहेत. परंतु या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादीला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे (बारामती), उदयनराजे भोसले (सातारा), सुनील तटकरे (रायगड), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), नवनीत राणा कौर (अमरावती), यांचा विजय झाला आहे. परंतु राज्यात आघाडीला अपेक्षित असं यश न मिळाल्यामुळे आणि बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारत परळीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकानं राजीनामा दिला आहे. नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

या राजीनाम्यात आंधळे यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण दिलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निकाल लागला असून मी प्रभाग क्र. ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून इमाने इतबारे गेल्या आडीच वर्षापासून जनतेची सेवा करत आलो आहे. परंतु ज्या प्रभागातुन विरोधी पक्षाला मताची आघाडी मिळाली. याची मी वैयक्तीक, नैतिक हार मानुन मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा परळी न.पचे गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्याकडे दिला असुन तो स्वीकारून उपकृत करावे ही नम्र विनंती आहे.मी पक्षाचा नगरसेवक नसलो तरी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जनतेच्या सदैव सेवेत राहील असे अभिवचन राजीनामा पत्रात आंधळे यांनी नमुद केले आहे.

COMMENTS