राष्ट्रवादीला मोठं खिंडार, 13 नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीला मोठं खिंडार, 13 नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नवीन मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळणार असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. या  नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भाजप प्रवेशासाठी बैठकांवर बैठका घेत असुन ते 15 ऑगस्टपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचंही माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान मार्च 2020 मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS