“धनंजय मुंडे खूप लहान आहेत, मी सुरु झालो तर अवघड होईल !”

“धनंजय मुंडे खूप लहान आहेत, मी सुरु झालो तर अवघड होईल !”

औरंगाबाद –  धनंजय मुंडे आणि नारायण राणेंमध्ये आता शाब्दीक वाद सुरु झाला असल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडेंच्या टीकेला माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे खूप लहान आहेत, त्यांनी उगाच माझ्यावर बोलू नये मी सुरु झालो तर अवघड होईल अशा शब्दात नारायण राणे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणे यांना लगावला होता.

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आपल्या पक्षवाढीसाठी राज्यभरात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाची पहिली सभा कोल्हापूरमध्ये घेतली होती. त्यानंतर औरंगाबाद आणि राज्यातील इथर ठिकाणी राणे जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेस सोडताना नारायण राणेंना भाजपनं मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु अजूपर्यंत भाजपनं त्यांना मंत्रीपद दिलं नसल्यामुळे राणेंना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राणेंवर टीका करत ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर धनंजय मुंडेंना राणेंनी प्रत्युत्तर दिलं असून धनंजय मुंढे खूप लहान आहेत त्यांनी माझ्यावर बोलू नये मी सुरु झालो तर अवघड होईल असं राणे म्हणाले आहेत.

 

COMMENTS