मुख्यमंत्र्यांकडे जशी गाय घेऊन जाणार तसे शिवसेनेकडे गाढव नेणार –धनंजय मुंडे

मुख्यमंत्र्यांकडे जशी गाय घेऊन जाणार तसे शिवसेनेकडे गाढव नेणार –धनंजय मुंडे

जळगाव – मुख्यमंत्र्यांकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे शिवसेनेकडे एक गाढव घेऊन जाणार असल्याचं वक्तव्य विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या धरणगाव येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना सतत सत्ता सोडण्याची भाषा करते परंतु ती काही सोडत नाही त्यामुळे सत्तेला लाथ कशी मारावी हे ते गाढव त्यांना शिकवेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/966244768526159878

दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी रूपये घेऊन पळाले तेव्हा चौकीदार काय करत होते? असा सवाल धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदींकडे केला आहे. तसेच राज्यात बळीचं राज्य यावं यासाठी आम्ही बळीराजाच्या नांगराचे पूजन केले. भाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल अशी जोरदार टीकाही त्यावेळी मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS