धनंजय मुंडेंना मताधिक्य देण्याचा नंदागौळकरांचा निर्धार !

धनंजय मुंडेंना मताधिक्य देण्याचा नंदागौळकरांचा निर्धार !

बीड, परळी – परळी तालुक्यातील नंदागौळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सौ.राजश्रीताई मुंडे, युवा नेते संजय दौंड यांच्या उपस्थितीत गावात डोअर टू डोअर प्रचार रॅली काढून परळी मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार्‍या धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

नंदागौळ येथे सकाळी 8 ते 10 यावेळेत राजश्रीताई मुंडे, संजय दौंड यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात येवून प्रत्येक घरामध्ये जावून येत्या 21 तारखेला नंदागौळ सह परळी मतदार संघातील शेतकरी, युवक महिला बचत गट यांसह संपूर्ण भागाचा येत्या काळात विकास करून बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून परळी तालुका समृध्द करण्यासाठी धनंजय मुंडे यांना विजयी करा असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केले. त्याचबरोबर भावनेच्या राजकारणाला बळी न पडता सामान्य माणसाच्या हाकेला धावून येणार्‍या धनंजय मुंडे यांना मतदान करून दिवाळीची भेट देण्याचे आवाहन युवा नेते संजय दौंड यांनी केले.

यावेळी प्रचार रॅलीस डॉ.संतोष मुंडे, बबनभाऊ गित्ते, सौ.मनिषाताई मुंडे, सरपंच सौ.पल्लवीताई गित्ते, युवा नेते सुंदर गित्ते, उपसरपंच शिवाजीराव गित्ते, माजी पं.स.सदस्य बाजीराव गित्ते, ग्रा.पं.सदस्य राजाभाऊ जगताप, नितीन जगताप, वैजनाथ गित्ते यांच्यासह गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य सौ.उषाताई गित्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपाच्या हुकूमशाहीच्या राजकारणाला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य सौ.उषाताई शिवाजीराव गित्ते यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

COMMENTS