लोकसभेसाठी राष्ट्रवादीची अंतिम यादी निश्चित, यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची अंतिम यादी निश्चित, यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभेसाठी राष्ट्रवादीची अंतिम यादी जवळपास निश्चित झाली असून याबाबतची घोषणा बाकी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक लढवणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे.

राष्ट्रवादीची अंतिम यादी ?

ठाण्यातून गणेश नाईक, बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, नाशिकमधून छगन भुजबळ, कोल्हापूरमधून धनंजय महाडीक, मावळमधून पार्थ पवार, भंडारा गोंदियामधून प्रफुल्ल पटेल, बीडमधून अमरसिंह पंडित, उस्मानाबादमधून अर्चना पाटील, शिरूरमधून दिलीप वळसे-पाटील, औरंगाबादमधून सतिष चव्हाण अशी जवळपास यादी निश्चित झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान ही यादी आज जाहीर केली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळी पार पडणा-या राष्ट्रवादीच्या बैठकीककडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS