नवी मुंबईत भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांना राष्ट्रवादीचा धक्का?

नवी मुंबईत भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांना राष्ट्रवादीचा धक्का?

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांना मोठा धक्का देणार असल्याची शक्यता आहे. कारण गणेश नाईक यांचा मोठा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं बोललं जात आहे. संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सपत्नीक गाडीने प्रवास केला आहे. संवाद यात्रेच्या माध्यामातून सुप्रिया सुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. नवी मुंबईतील संवाद यात्रेवेळी संजीव नाईक हे आपल्या पत्नीसह सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे ते राष्ट्रवादीतच राहतील असं बोललं जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईत नाईक कुटुंबासह राष्ट्रवादीचे इतर नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु अशातच खासदार संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं बोललं जात आहे. संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सपत्नीक गाडीने प्रवास केला आहे. त्यामुळे नाईक कुटुंबामध्ये मोठी फूट पडणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS