“नारायण राणेंची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी !”

“नारायण राणेंची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी !”

नांदेड – महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची अवस्था आगीतुन फुफाट्यात पडल्यासारखी झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपाने राणेंना गाजर दाखवलं असून भाजपचं निवडणूक चिन्ह बदलून गाजर केलं पाहिजे असा टोला अजितदादांनी त्यावेळी लगावला आहे. राणे आता हताश झाले आहेत. मंत्री करण्यासाठी त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना धमकी दिली असून मी मुख्यमंत्री होतो मला मंत्री करा असं ते म्हणत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची अशी अवस्था केली असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा नांदेड जिल्ह्यात पोहचली असता यादरम्यान बोलत असताना अजित पवारांनी ही टीका केली आहे. उमरी येथील सभेत बोलत असताना त्यांनी पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यावरही टीका केली आहे. जनावरांना होणाऱ्या आजारांवरील लसीकरण उपलब्ध नाही अशावेळी पशुसंवर्धन मंत्री बेजबाबदार उत्तर देत असल्याची टीका पवारांनी केली. सगळे कमीशन घेण्यासाठी हपापलेले आहेत असा आरोप ही पवारांनी त्यावेळी केला आहे.

 

COMMENTS