…अन्यथा चून चून के मारेंगे, धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा !

…अन्यथा चून चून के मारेंगे, धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा !

नाशिक – आमच्या लोकांना त्रास देवू नका. मौका सभी को मिलता है, वेळ आमचीही येणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळी चुन चुन के मारेंगे असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. श्रीपाद छिंदमविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांनी असा इशारा दिला आहे. निफाडमध्ये पार पडलेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला आहे. आत्ताची शिवसेना ही शिवसेना नसून ती भिवसेना झाली आहे. त्यांनी आता वाघाच्या चिन्हाऐवजी शेळी नव्हे तर सशाचे चिन्ह लावावे असं म्हटलं आहे. तसेच सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करत आहे. सारखी लाथ मारणारा प्राणी कोण, हे सर्वज्ञात आहे असा टोलाही त्यांनी लगावला.तसेच चाबकाला एकवेळ बैल बुजतो तसेच कधी वाघ समोर आला तर तोही घाबरतो. परंतू सत्तेत जर गेंडा असेल तर चाबकाने त्याचे करायचे काय. या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला असून रेशनवरील डाळ, साखर, तांदुळ, रॉकेल सरकारने बंद केले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

 

COMMENTS