राष्ट्रवादी काँग्रेसचा आता उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल !

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल !

मुंबई – विदर्भ व मराठवाड्यातील यशस्वी हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासtन उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. सात दिवसांच्या या झंझावती दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगांव, धुळे या जिल्ह्यात 21 सभा होणार असून दहा मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील या दौर्‍याचा समारोप होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबर महिन्यापासून राज्यभरात हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे. 1 ते 11 डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा केल्यानंतर जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दहा दिवसात 27 सभांनी संपूर्ण मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पिंजून काढला होता. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात आपले हे आंदोलन सुरू केले असुन, त्याचा शुभारंभ गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथुन होत आहे. 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या सात दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 21 सभा होणार असुन, समारोप नाशिक येथे 10 मार्च रोजी होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराती, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक, विद्यार्थी, विविध आघाड्यांचे प्रमुख आमदार, खासदार, सेलचे प्रमुख व पक्षाचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

 

COMMENTS