राष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी !

राष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी !

औरंगाबाद –  जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असेलले आणि भाजपच्या वाटेवर असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांच्याशी काल औरंगाबादमध्ये झाला.

या लग्नसोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते या विवाहाला हजर  होते. दोन्ही बाजुने राजकीय मंडळीच असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी या विवाहाला हजेरी लावली. संध्याकाळी सातचे लग्न असल्यामुळे सर्व स्थानिक नेतेमंडळींनी हजेरी परत गेले. मुख्यमंत्री मात्र रात्री उशीरा लग्नमंडपी दाखल झाले. त्यांच्यासोबत एकाच विमानातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. दोघांना एकत्र पाहून सर्वचजण अचंबित झाले.

या दोन नेत्यांच्या दौ-याची माहिती दोन्ही बाजुचे मोजके कार्यकर्ते यांनाच माहित होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी  आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी त्यांच्या त्यांच्या पक्षातील फार कमी कार्यकर्ते उपस्तित होते. मग या दोन्ही नेत्यांच्या दौ-याबाबत एवढी गुप्तता का पाळली गेली अशी राजकीय कुजबुज सुरू झाली आहे.

 

COMMENTS