निराधारांना योजनेचा लाभ तात्काळ द्या, अन्यथा खुर्च्या  खाली करा – प्रा. ईश्वर मुंडे

निराधारांना योजनेचा लाभ तात्काळ द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा – प्रा. ईश्वर मुंडे

बीड, धारूर – तालुक्यातील निराधार, विधवा,ज्येष्ठ नागरिक व अपंगांना देण्यात येणारे अनुदान प्रलंबित आहे तरी पात्र लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वितरीत करावे.नवीन अर्जदारांच्या अर्जावर तात्काळ बैठकीत निर्णय घेवून त्यांना अनुदान पात्र घोषीत करुन अनुदान द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धारूर तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांनी तहसिल प्रशासनाला दिला आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रतिमहीना रु.एक हजार प्रमाणे मानधन लाभार्थींना मिळते.तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्ध पाळ योजने अंतर्गत जेष्ठ नागरीक, विधवा, अपंग यांना शासनाचा लाभ मिळतो.

परंतू तीन ते चार महिन्यांपासून सदरील मानधन न मिळाल्यामुळे या निराधारांची दिवाळी आंधारात गेली. तरीही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. आता तरी पात्र लाभार्थींना तात्काळ मानधन वितरीत करावे तसेच नवीन अर्जदारांचे अर्ज निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावून पात्र लाभार्थींना अनुदान वाटप करावे.

अन्यथा अकार्यक्षम व भावनाहीन अधिकाऱ्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात असा ईशारा धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांनी निवेदनाद्वारे धारूर तहासिल प्रशासनाला दिला आहे.

COMMENTS