महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी आणि नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी पदी पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.

मार्च, एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन, निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा राबवून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने, तसेच पक्षाची धेय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शशिकांत शिंदे सहकार्य करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, समन्वयक बसवराज पाटील नागराळकर उपस्थित होते.

COMMENTS