झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएमची बहुमताच्या दिशेने वाटचाल, राष्ट्रवादीही खोलणार खातं?

झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएमची बहुमताच्या दिशेने वाटचाल, राष्ट्रवादीही खोलणार खातं?

नवी दिल्ली – झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून या राज्यात काँग्रेस आणि जेएमएम आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. तर
झारखंडमधील एका मतदारसंघात राष्ट्रवादीही खातं खोलणार असल्याचं दिसत आहे. कारण याठिकाणी राष्ट्रवादीचा एक उमेदवार पुढे असल्याची माहिती आहे. हुसेनाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आहे. या जागेवरचा निकाल अद्याप स्पष्ट झाला नसला तरीही सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार राष्ट्रवादीचे कमलेश कुमार सिंह हे आघाडीवर आहेत. त्यामुळे याठिकाणी त्यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान 81 जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपला धक्का बसत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी 42 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे. तसंच 11 ठिकाणी इतर पक्ष आघाडीवर आहेत.झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे या निवडणुकीत बहूमताचा आकडा कोण पार करणार याकडे लक्ष लागलं आहे.

2014 मधील निवडणुकीची स्थिती

झारखंड विधानसभेमध्ये 81 सदस्य असून 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे 44, झारखंड मुक्ती मोर्चाकडे 16, काँग्रेसकडे 6, आसूकडे 3, जे. व्ही. एम.कडे 2, सीपीआय एम एलकडे 01, बीएसपी कडे 01, एमसीसी कडे 01 तर सात जागा रिक्त होत्या.

COMMENTS