कळंब राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष व काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात ?

कळंब राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष व काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात ?

उस्मानाबाद – कळंब नगर परिषद उपनगराध्यक्ष यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये चांगलीच गटबाजी उफळून आली असुन उपनगराध्यक्षा सह काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात जोरदार चालू आहे.

कळंब नगर परिषद येथे राष्ट्रवादीकडे एक हाती सत्ता आल्यामुळे उपनगराध्यक्ष म्हणून संजय मुंदडा यांची वर्णी लागली होती. उपनगराध्यक्ष निवड करताना १८ महिने उपनगराध्यक्षाचा पदभार देण्याचा अलिखीत करार करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी मुंदडा यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचालीला वेग आला आहे. मात्र उपनगराध्यक्ष यांनी पद वाचवण्यासाठी बंड केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी चे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपनगराध्यक्ष यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व राष्ट्रवादीच्या मंडळी यांनी मागील काही दिवसापुर्वी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी भेट घेतली असुन यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

दिनांक ११ ऑगस्ट रोजी कळंब भाजपाच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवक यांच्या प्रवेशा बाबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र यावेळी चर्चा झालेली नसल्यामुळे नेमकी का? चर्चा करण्यात आली या बाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS