राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर अ‍ॅट्रॉसिटी, गुन्हा खोटा असल्याचे दलित संघटना सह विविध संघटनांचे निवेदन !

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर अ‍ॅट्रॉसिटी, गुन्हा खोटा असल्याचे दलित संघटना सह विविध संघटनांचे निवेदन !

उस्मानाबाद: राष्ट्रवादी कॉग्रेस चे कळंब शहराध्यक्ष सागर मुंडे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर खंडागळे (रा. कळंब ) यांना सागर मुंडे यांनी खुर्चीवर बसले असता जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत कळंब पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

परंतु सागर मुंडे यांच्यावर दाखल झालेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा राजकीय मतभेदातून केला असून, गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी दलित संघटनासह राष्ट्रवादी कॉग्रेस, सामाजिक संघटना यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात कळंब येथील शंकर प्रभाकर खंडागळे यांनी राजकिय वैमानस्यातुन व राजकीय मंडळीच्या सांगण्या वरुन शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सागर सुभाष मुंडे यांच्या विरुध्द अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दिला होता. या मध्ये ८ ते ९ साक्षीदारांचे जवाब नोंदविण्यात आलेले असून या मध्ये सत्य परिस्थिती चे कथन करण्यात आलेले असताना सुद्धा २७ सप्टेंबर रोजी सागर मुंडे यांच्या विरोधात अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा नोंद केलेला आहे. जो तात्काळ रद्द करणे किंवा त्या स्वरुपाचा अहवाल आपल्या वरिष्ठांना पाठवण्याच मागणी निवेदना मध्ये करण्यात आली आहे.
हा खोटया स्वरुपाचा गुन्हा नोंद झाल्यास दलित समाजाबद्दल गैरसमज होण्याची शक्यता असुन समाजात आरजकता माजुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अॅट्रासिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी दलित पँथरचे मराठवाडा अध्यक्ष ज्ञानदेव हौसलमल, राष्ट्रवादी कॉग्रेस चे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तारेख मिर्झा, राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष लखन गायकवाड राष्ट्रवादी मागसवर्गीय सेल शहराध्यक्ष किरण मस्के, लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष खय्युम सय्यद, सकल लिंगायत समाज आदी संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांना निवेदन दिले आहे.

COMMENTS