एक वेळा अपक्ष तर तीन वेळा राष्ट्रवादीतून आमदार झालेला ‘हा’ नेता शिवसेनेच्या वाटेवर?

एक वेळा अपक्ष तर तीन वेळा राष्ट्रवादीतून आमदार झालेला ‘हा’ नेता शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपात गेले. यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहेत. अशातच आणखी एक ज्येष्ठ नेता शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांनी महिनाभरापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते शिवसेनेत जातील अशी चर्चा आहे. परंतु आपण उद्धव ठाकरे यांना भेटलो नसल्याचं सलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान युतीच्या जागावाटपात आजपर्यंत जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल हो दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडलेले आहेत. त्यामुळे याहीवेळी शिवसेना काटोलसाठी आग्रही राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला तर शिवसेनेत जाऊन देशमुख हे विधानसभेची निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

अनिल देशमुख हे या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते आहेत. 1995 ते 2009 पर्यंत चार वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या 20 वर्षांत भाजप-शिवसेना युतीतून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होती. परंतु आजपर्यंत शिवसेनेला याठिकाणी विजय मिळवीता आला नाही. परंतु 2014 मधील निवडणुकीत पुतणे डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपच्या तिकीटावर लढून अनिल देशमुखांचा पराभव केला होता. त्यामुळे देशमुख आता शिवसेनेत प्रवेश घेऊन आगामी निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

COMMENTS