राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचं कोरोनामुळे निधन!

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचं कोरोनामुळे निधन!

पुणे – राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून जुन्नर येथील नेत्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे यांचं कोरोनामुळे निधन झालं असून ते 58 वर्षांचे होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.या दरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे.

दरम्यान दुबे हे जुन्नर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते होते. जुन्नरमध्ये अनेक कामात त्यांचा सहभाग होता. मागील महिन्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिनेश दुबे आंदोलनात सहभागी झाले होते.  तसेच माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या जाण्यामुळे जुन्नर राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS