राष्ट्रवादीला धक्का, तालुकाध्यक्षाचा भाजपात प्रवेश !

राष्ट्रवादीला धक्का, तालुकाध्यक्षाचा भाजपात प्रवेश !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखी एक धक्का बसला असून भोकरदन विधानसभा मतदारसंघाती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदू पाटील गिर्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच ते भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नंदू पाटील गिर्हे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

दरम्यान भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पुंडलिकराव दानवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत तर त्यांच्याविरोधात  संतोष रावसाहेब दानवे हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये खरी लढत होणार आहे. परंतु नंदू पाटील गिर्हे हे भाजपच्या गळाला लागल्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं नंदू पाटील गिर्हे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS